Swargate : घरफोडी करून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास 

एमपीसी न्यूज : घरफोडी करून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना काल गुरूवारी (दि.13) सकाळी सव्वाआठच्या सुमारास बाणेर रोड, सोमेश्वरवाडी रोड येथील निकाश स्काईज येथे घडली.

याप्रकरणी शिल्पा राजे (वय 39, रा.बाणेर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शिल्पा यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले. आणि त्या चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे तब्बल 3 लाख 25 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.