Swargate – पावभाजीच्या ऑर्डरला उशीर केल्याने कामगारास लोखंडी हत्यारांनी मारहाण

एमपीसी न्यूज – पावभाजीच्या ऑर्डरला उशीर केल्याच्या कारणावरून हातगाड्यावरील मालकास चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना काल रविवारी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास स्वारगेटजवळील पुणे-सातारा रोडवर असणा-या पुजा पावभाजी आणि ए-वन सॅंडविच या हातगाड्याजवळ घडली.

याप्रकरणी मिलींद भालेराव (वय 42, रा.महर्षीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मिलींद यांचे स्वारगेटजवळील पुणे-सातारा रोडवर पुजा पावभाजी आणि ए-वन सॅंडविच नावाचा हातगाडा आहे. त्यांच्या हातगाड्यावर काल १२:३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी येऊन कामगाराला पावभाजीची ऑर्डर दिली. दरम्यान कामगाराला पावभाजी बनविण्यासाठी उशीर झाल्याच्या कारणावरून त्या चौघांनी मिळून फिर्यादी मिलिंद यांना शिविगाळ करत गाड्यावरीस लोखंडी हत्यारांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.आणि त्यांना धमकी देऊन ते चारजण तेथून निघून गेले.

याप्रकरणी चार अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.