_MPC_DIR_MPU_III

Pimpri : सावरकर मंडळाचा वनमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाच्या वतीने घोरावडेश्वर डोंगर येथे वनमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यामध्ये विविध पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिक सहभागी झाले. मेळाव्याचे यंदा दहावे वर्षे होते. यावेळी धनंजय शेडबाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन हरित घोरावडेश्वर या प्रकल्पाची माहिती दिली व वृक्षसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

_MPC_DIR_MPU_IV

मेळाव्यास पराग कुलकर्णी, दत्तात्रय माळी, प्रशांत बेंद्रे, मनेश म्हस्के, अर्जून कुंभार, सुनील गुरव, प्रमोद जोशी, भालचंद्र वडके, नानिवडेकर काका, श्रेया पंडीत, मानसी म्हस्के, प्रभाकर कारंडे, हेमंत थोरात, विकास देशपांडे, नितीन बढे, रवी मनकर, प्रशांत बेंद्रे, राहुल माने आदींसह ओम निसर्ग मित्र चिंचवड, पिंपळे गुरव ग्रामस्थ, पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब, इटॉन कंपनीचे प्रतिनिधी, पोलिस नागरिक मित्र, संस्कार प्रतिष्ठान, साई कॉम्प्युटर इंस्टीट्युट, आवर्तन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

वणव्यापासून झाडांचे रक्षण करण्यासाठी डोंगरावरील गवत कापण्याचे काम निसर्ग मित्र अव्याहतपणे करीत आहेत. परंतु  डोंगराचा विस्तार व कामाची व्याप्ती मोठी असल्याने सावरकर मंडळ महिला विभागाने पुढाकार घेऊन एक नवीन गवत कापायचे मशीन भेट दिले. यामध्ये अन्य निसर्ग मित्रांनीही आर्थिक योगदान दिले. शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांच्या हस्ते या मशीनची पूजा करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संस्थांच्या वतीने मनोगत व त्यांचे कार्य प्रतिनिधींनी व्यक्त केले. त्यावेळी सावरकर मंडळाचे उपक्रम हे दिशादर्शक असून त्यापासून प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असल्याचे सर्वांनी आवर्जून सांगीतले. डॉ. प्राजक्ता पठारे, श्रीकांत मापारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भास्कर रिकामे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. 250 पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमींची उपस्थिती लाभलेला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रवी मनकर, विजय सातपुते, दीपक पंडीत, लाला माने, दीपक नलावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. शैलेश भिडे यांनी आभार मानले व शिवरायांचा जयघोष करुन मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.