Nigdi : निगडी येथे मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभ

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मंगळवार (दि. २८) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार पश्चिम बंगालचे भारत सेवाश्रम संघ बेलडंगाचे स्वामी प्रदिप्तानंद (कार्तिक महाराज) यांना व राज्य पुरस्कार नाशिक येथील विभाग संयोजक, धर्मजागरण समन्वय प्रमुख, जनजाती परियोजना पश्चिम महाराष्ट्राचे प्रदीप हरिभाऊ बच्छाव यांना जाहीर झाला आहे.

हे पुरस्कार श्रीमद जगदगुरु शंकराचार्य संस्थानमठ संकेश्वर – करवीरचे श्री. प. पु. सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख एक लाख रुपये,  राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख एकावन्न हजार रुपये असे असणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, सहसचिव प्रदीप पाटील,  रमेश बनगोंडे, दिपक नलावडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.