Pune : पुण्यात स्वाईन फ्लूची लागण ; 8 महिन्यांत 41 जणांना स्वाईन फ्लू 

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून शहरात स्वाइन फ्लूचा रुग्णांमध्ये वाढ होत असून आणखी एकाला त्याची बाधा झाली आहे. आठ महिन्यात शहरात एकूण 41 जणांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला आहे. शहरात 17 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत त्यापैकी 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे.

शहरात स्वाइन फ्ल्यूची आतापर्यंत 41 जणांना बाधा झाली आहे. आतापर्यंत स्वाइन फ्लू झालेल्या 21 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 17 जणांवर उपचार सुरू आहेत, त्यातील पाच जणांवर जनरल वॉर्ड तर 12 जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याची माहिती, महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

त्याचप्रमाणे स्वाइन फ्ल्यू पॉझिटिव्ह असलेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या 3 हजार 749 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 55 जणांना टॅमिफ्लू औषधाच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात 5 लाख 72 हजार 370 जणांची तपासणी शहरात करण्यात आली आहे. त्यातील 5 हजार 516 जणांना टॅमिफ्लू च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर 821 जणांच्या घशातील स्त्राव तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.