Pimpri : स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज (गुरुवारी) एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

चिखली येथील 48 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून सोमवारी (दि. 27) एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने त्याच दिवशी त्या महिलेला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान आज (गुरुवारी) त्या महिलेचा मृत्यू झाला.

निगडी येथील एका 41 वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून मंगळवारी (दि. 28) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने त्यांना देखील त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचा देखील आज (गुरुवारी) मृत्यू झाला.

मागील आठ महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात 9 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर सध्या 13 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.