BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले

दक्षता घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

270
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

1 जानेवारी 2018 पासून 7 लाख 55 हजार 127 रुग्णांची महापालिकेच्या सर्व रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 604 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर, वर्षभरात सहा रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी एका रुग्णाचा जानेवारी महिन्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आता स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले. पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा सक्रीय झाला आहे. बुधवारी एक आणि आज (गुरुवारी) स्वाईन फ्लूची लागण झालेले दोन रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर शहरातील दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.