BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : स्वाईन फ्ल्यूचा चाकण मध्ये दुसरा बळी

223
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चाकण व परिसरात स्वाईन फ्ल्यूने चांगलेच डोके वर काढले असून, मागील आठवड्यात चाकण येथील एका विवाहितेच्या मृत्यू नंतर आता कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील पस्तीस वर्षीय विवाहितेचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. चाकण भागातील स्वाईन फ्ल्यूचा हा दुसरा बळी असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शर्मिला एकनाथ कड ( वय – ३५ वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड ) असे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रदीप शंकर कड ( वय – २६ वर्षे, रा. कडाचीवाडी,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्याच आठवड्यात अनिता सिंग ( वय – ३० वर्षे, रा.मेदनकरवाडी-चक्रेश्वर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे.) या विवाहितेचा या गंभीर आजाराने मृत्यू झाला होता.  दरम्यान शर्मिला कड यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचा पाॅझीटीव्ह आहवाल प्राप्त झाला आहे. कड यांना सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा अखेर मृत्यू झाला. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

गणेशोत्सवात दक्षतेची गरज 
पावसाने पाठ फिरवली असली तरी, थंड हवामानामुळे चाकण परिसरात आता डेंग्यूसह साथीचे आजार आणि स्वाइन फ्ल्यूनेही थैमान घातले आहे. बदलत्या हवामानामुळे शहरात स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, सप्टेंबर महिन्यातील दहा-बारा दिवसांत दोन जणांचा स्वाइन फ्ल्यूने बळी घेतला आहे. पंचक्रोशीतील आणखी काही जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी भाविक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. गर्दीमुळे स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने वैद्यकीय विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्याची आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.