23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Symbiosis : सिंबायोसिसतर्फे ‘इमर्जिंग डिजिटल मीडिया लँडस्केप – 2022’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : सध्याचे युग हे डिजीटल युग आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही त्यामध्ये डिजीटल मिडीयाचा उपयोग होत नाही. सिंबायोसिस (Symbiosis) स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) पुणे यांच्या स्कूल ऑफ मिडीया मॅनेजमेंट या विभागाने ‘इमर्जिंग डिजिटल मीडिया लँडस्केप – 2022’ या विषयावर एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) आणि मिडीया अँड एंटरटेनमेंट स्किल सेक्टर (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने हि राष्ट्रीय परिषद 26 जून रोजी एसएसपीयू कॅम्पस किवले येथे सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे.

भारत सरकारचे केंद्रीय माहिती प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे या राष्ट्रीय परिषदचे प्रमुख पाहुणे आहेत. या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट असे आहे, की इमर्जिंग डिजिटल मीडिया आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या बदलत्या लँडस्केपवर प्रकाश टाकणे आहे. यामध्ये मीडियातील तज्ञ आणि मीडियातील उद्योग, व्यवसायासंबधी माहिती, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील संधी आणि या क्षेत्रातील नोकरीच्या नवीन संधी या बद्दल मीडियातील तज्ञ मान्यवर व्यक्ती विद्यार्थांना संबोधित करणार आहेत.

डिजिटल कम्युनिकेशन आणि मीडिया टेक्नॉलॉजी, मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योग या क्षेत्रामध्ये युवा वर्गाला व विद्यार्थांना अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, एआर व्हीआर आणि टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी यासाठी कंटेंट निर्मिती करणे यासारख्या संधी उपलब्ध आहेत. मोबाइल व्हिडिओची वाढणारी संख्या, आभासी वास्तविकता (VR), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR), डेटा अनॅलिटीकक्सचा योग्य पद्धतीने वापर, डिजिटल मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यावर योग्य प्रभाव पडेल. हे स्पष्ट आहे, की मिडीया पदवीधर आणि मीडिया व्यावसायिकांसाठी अशा नवीन तंत्रज्ञानातून आणि नव्या उपक्रमातून (Symbiosis) उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

या परिषदेमध्ये तज्ञांची सत्रे, आणि पॅनल चर्चां यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मीडिया उद्योगातील तज्ञ त्यांचे विचार मांडतील आणि डिजिटल मीडियाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. या परिषदेमध्ये पॅनेल चर्चा, मीडिया क्षेत्रातील तज्ञांची भाषणे / सत्र असणार आहेत. त्यामुळे यामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्याना आपल्या शंकाचे निरसन करता येणार आहे.

PCMC Property tax : नागरिकांनी 30 जूनपर्यंत मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा

अॅनिमेशन, व्हीएफएक्स (VFX), गेमिंग आणि कॉमिकमधील संधी, ओटीटी (OTT), टीव्ही आणि चित्रपट निर्मिती, ए.आर – व्हि.आर (AR VR) – इमर्सिव्ह मीडिया आणि न्यूएज स्किल्स या विविध विषयांवर पॅनेल चर्चा होणार आहेत. साउंड डिझाईनर – रेसुल पुकुट्टी, अॅनिमेशन शैली – सुरेश, ब्युटी हा चित्रपट बनवणाऱ्या – फॅंटम व्हीएफएक्स (VFX) इत्यादी मान्यवर व्यक्ती ही भाषणे आणि सत्र घेणार आहेत.

मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील संधी यासाठी अमित बहल आणि अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक उद्योगातील संधी यावर आशिष कुलकर्णी या तज्ञांचे चर्चासत्र होणार आहे.

spot_img
Latest news
Related news