Symbiosis Skills Day : अन मेट्रो स्टेशनवरच भरले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – या वर्षी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर ‘सिंबायोसिस स्किल्स डे’ (Symbiosis Skills Day) हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन हे एसएसपीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी मनोज कुमार डॅनियल (उपमहाव्यवस्थापक, मल्टी मॉडल इंटिग्रेशन, महामेट्रो) आणि राजेश जैन (सहाय्यक महाव्यवस्थापक, महामेट्रो) इत्यादी उपस्थित होते. सिंबायोसिसतर्फे गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर स्केटिंग हॉव्हरबोर्ड्स, मेट्रो प्लॅटफॉर्मवर गाणे आणि नाचणे, विक्री करण्यासाठी विविध स्टॉल, मेट्रो कोचमध्ये फॅशन शो इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या 17 विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कौशल्ये प्रदर्शित केले.

या कार्यक्रमात 25 वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्समध्ये स्थापत्यशास्त्र मॉडेल्स, इलेक्ट्रिक वाहने, रस्ता सुरक्षा अभियान, ब्लॉक चेन लॉजिस्टिक मॉडेल्स यांचा अंतर्भाव होता. यात रांगोळी स्पर्धेने लोकांची मने जिंकून घेतली.

गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर (Symbiosis Skills Day) ब्युटी अँड वेलनेस या विषयांचे विविध सत्र घेण्यात आले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मेकअप आणि नेल आर्टचे कौशल्य दाखवले. गरवारे मेट्रो स्टेशनला भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांचा विद्यार्थ्यांच्या या कौशल्यावर विश्वास बसत नव्हता. ब्युटी अँड वेलनेस विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना ऐनापुरे यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. खूपच कमी कालावधीत या विद्यार्थ्यांनी ब्युटी अँड वेलनेस या विषयाचे कौशल्ये आत्मसात करून घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थी प्रवाशांशी बोलून त्यांनी नखांसाठी कोणता रंग निवडावा किंवा पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करणे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत .

World Bamboo Day : जागतिक बांबू दिनानिमीत्त पुण्यात ‘चक्र’ बांबूच्या अनोख्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही राज्यातील पहिली स्किल युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये 70 टक्के प्रात्यक्षिक आणि 30 टक्के थियरी शिकवली जाते. या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्यक्ष फिल्ड वर काम कसे केले जाते याचे प्रशिक्षण दिले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.