Pimpri News : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी महिला काँग्रेसचे पालिका प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही. याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज गुरूवारी (दि.19) सकाळपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू या झालेल्या आंदोलनात महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कवीचंद भाट, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी नगरसेविका निर्मला कदम, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, विश्वनाथ जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, उमेश खंदारे, बाबा बनसोडे, डॉ. मनीषा गरुड, स्वाती शिंदे, नंदा तुळसे, दीपाली भालेकर, छायावती देसले, वैशाली दमावानी, रिटा फर्नांडिस, निर्मला खैरे, सीमा हलकट्टी, सुप्रिया पोहरे, प्रियांका मलशेट्टी, भारती घाग, वैशाली शिंदे, शितल सिकंदर, सुवर्णा कदम, राधिका अडागळे, शिल्पा गायकवाड, आशा भोसले, शिवानी भाट, सरला जॉय, मंगला जोगदंड, नागेंद्र भंडारी, मीना रानडे, कुसुम वाघमारे, विमल खंडागळे, कांती देवी, काशीबाई पुलावळे, पुष्‍पा रेवरे, लक्ष्मी श्रींगारे, किरण नढे, सौरभ शिंदे, विजय ओव्हाळ, अनिता अधिकारी, सिस्टर साळवी, सुनिता जाधव, उमेश बनसोडे, हरीश डोळस, मोहसिन शाह, करण गिल, आण्णा कसबे, जुबेर खान, अर्जुन लांडगे, के. हरिनारायण, हिराचंद जाधव, किरण खाजेकर, नितीन खाजेकर, विशाल सरवदे, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, मिलिंद फडतरे, आकाश शिंदे, राहुल ओव्हाळ, जेवियर ऍंथोनी, आबा खराडे आदी उपस्थित होते.

मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी- चिंचवड शहराला 24 तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी, दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिका-यांनी केला. या बेमुदत लाक्षणिक उपोषणास समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी, भाट समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंद भाट, मातंग एकता आंदोलनाचे राधिका अडागळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.