Pimpri Corona Update: शहरातील सक्रिय 253 रुग्णांपैकी केवळ 4 बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणे

Symptoms of corona virus in only 4 out of 253 active patients in the pimpri-chinchwad corona update

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील सक्रिय पॉझिटिव्ह 253 रुग्णांपैकी केवळ 4 रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणे आहेत. उर्वरित 235 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. सात रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत शहरातील 451 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दि. 10 मार्च रोजी राज्यातील पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सलग 12 रुग्ण सापडले होते. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर एप्रिलपासून पुन्हा शहरातील रुग्ण वाढीला सुरुवात झाली. बघता-बघता रुग्ण संख्येने साडेचारशेचा टप्पा गाठला आहे.

शहरातील 451 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 191 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आजमितीला 253 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काही रुग्णांवर महापालिका तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

शहरातील 22 ते 39 वयवर्षे असलेल्या 178 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 68 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 51 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 46 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like