T-20 World Cup : मोठी बातमी ! आंतरराष्ट्रीय T-20 वर्ल्ड कप ‘युएई’त होणार

एमपीसी न्यूज – भारतात नियोजित आंतरराष्ट्रीय T-20 वर्ल्ड कप युएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची आयसीसी T-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार असल्याचे आज (29 जून) आयसीसीने जाहीर केले आहे.

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे होणार असून याचे यजमानपद (बीसीसीआय) भारताकडे असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

दुबई, अबुधाबी, शारजाह आणि ओमान या चार ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसानंतर 17 ऑक्टोबरपासून T-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियामधील प्रस्तावित 2020 T-20 वर्ल्डकप पुढे ढकलला होता.

T-20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांना संधी देण्यात आली आहे. एकूण 45 सामने होणार आहेत. पहिली फेरी 8 संघांमध्ये असेल. दोन गटात 4–4 संघ असतील. एकूण 12 सामने होणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल संघ सुपर-12 साठी पात्र ठरेल. येथे 12 संघ दोन गटात विभागले जातील. एकूण 30 सामने होणार आहेत. यानंतर दोन सेमीफायनल आणि फायन सामना होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.