Mumbai : मे अखेरपर्यंत ठरणार T-20 विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक; या तीन पर्यायांचा होऊ शकतो विचार

T-20 Worldcup's new timetable will be declared by May end amid corona virus pandemic.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर IPL सह इतर सर्व क्रिकेट सामने अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. क्रीडाविश्वातून मात्र ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी T-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल बरेच तर्क वितर्क समोर येत आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या आयसीसी T-20 विश्वचषकावर कोरोना या वैश्विक महामारीचे सावट पसरले आहे. या विश्वचषकाबाबत ‘मे’ महिन्यांच्या शेवटी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती क्रिडा विश्वातून समोर येत आहे. 28 मे ला आयसीसीच्या बोर्डाच्या होणाऱ्या बैठकीत आयसीसी T-20 विश्वचषकाबाबत आयसीसी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष क्रिस टेटली तीन पर्याय मांडू शकतात.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला आयसीसी बोर्डच्या एका सदस्याने या 3 पर्यांयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले समिती पहिला पर्याय म्हणून,  T-20 विश्वचषकाचे आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार करेल, मात्र खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची अनुमती सुद्धा दिली जाईल.

दुसऱ्या पर्यायाबद्दल बोलताना ते म्हणाले, T-20 विश्वचषकाचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना केले जाऊ शकते. तर, T-20 विश्वचषक 2020 हा 2022 पर्यंत स्थगित केला जाऊ शकतो, हा तिसरा पर्याय समिती मांडू शकते, असे ते म्हणाले.

आयसीसी बोर्ड सदस्याने हेही सांगितले की, काही महिन्यांसाठी विश्वचषकाला पुढे ढकलण्याचा विचार केला जाऊ शकत नाही. कारण, फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये महिला वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे 2 आयसीसी इव्हेंट एकाच वेळी होऊ शकत नाहीत. महिला वनडे विश्वचषकात फक्त 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचे आयोजन करणे अधिक सुरक्षित ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.