Talewade News : डीअर पार्क नव्हे बायोडायव्हरसिटी  पार्क उभारणार

एमपीसी न्यूज –  इंद्रायणी नदीच्या परिसरातील तळवडे गायरानात डीअर सफारी (Talewade News ) पार्कऐवजी बायोडायव्हरसिटी  पार्क उभारण्यात येणार आहे. वन विभागाने डीअर पार्कसाठी हे गायरान योग्य नसल्याचा अभिप्राय दिल्यानंतर हा आरक्षणातील बदल करण्यात आला आहे.

 

 

 

डीअर पार्क करण्याबाबतचा अभिप्राय वनविभागाला महापालिकेने मागितला होता. तळवडेतील आरक्षणात डीअर पार्क (हरिण पार्क) उभारण्यास वनविभागाने नकार दर्शविला आहे. या परिसरात औद्योगिक परिसर वाढत असून भविष्यात मानवी हस्तक्षेप वाढू शकतो. तो हरणासारख्या प्राण्यांसाठी पोषक राहणार नाही, असे अभिप्राय वनविभागाने दिला आहे.

 

 

Talegaon Dabhade : तळेगावातील स्वराज नगरीत स्वामींचा प्रकट दिन  साजरा  

 

 

त्यांचा नकारात्मक अभिप्राय आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी केली व आरक्षणच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोडायव्हर्सिटीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकांना देण्यात (Talewade News ) आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.