T20 WC 2021 : T20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा; असिफ अली, खुशदिल शहा यांना संधी

 एमपीसी न्यूज – आगामी T20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली जात जात आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. 15 सदस्यीय खेळाडूंमध्ये असिफ अली, खुशदिल शहा यांना संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तान संघाचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी भारतीय संघासोबत होणार आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघासोबत पाकिस्तान भिडेल. दरम्यान, न्यूझीलंड संघाने देखील यापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना पाकिस्तानने यावेळी युवा खेळाडूंना जास्त संधी दिली आहे. यष्टीरक्षक आझम खानला संधी देण्यात आली असून सरफराज अहमदला संघातून वगळण्यात आले आहे. आझम खानने यापूर्वी फक्त स्थानिक तीन T20 सामने खेळले आहेत.

असा आहे पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार),
शादाब खान (उपकर्णधार),
आसिफ अली, आझम खान, हॅरिस रैफ, फकर जमान, इमाद वसीम, खुशदील शहा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, एस दहानी, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम (ज्यू), शाहिन आफ्रिदी, शोएब मकसूद, हसन अली, उस्मान कादीर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.