T20 WC : T20 वर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा, शिखर धवनला वगळले

एमपीसी न्यूज – T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर शिखर धवन संघातून वगळण्यात आले असून, अनेक नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे.

भारतात होणारा T20 वर्ल्डकप कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. 2016 नंतर पहिल्यांदाच T20 वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी नुकताच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

 

असा आहे संघ 

विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती हे संघात असतील, तर श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील. 

धोनी करणार मेन्टॉरशीप 

T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघासाठी पूर्व कप्तान एम एस धोनी मेन्टॉरशीप करणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.