T-20 World Cup News: 2021 मधील T-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

एमपीसी न्यूज – 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धचे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.  पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन T20 विश्वचषक स्पर्धाच्या आयोजना विषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत 2021-22 T20 विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला.

 

त्यानुसार 2021 चा T20 विश्वचषक भारतातच होणार असून 2022 चा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

 

महिलांचा 2021 एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन T20 विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये होणारा T20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2021 च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला 2021 ऐवजी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकेल, असे बोलले जात होते.

 

अखेर 2021 च्या T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून 2022 चा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

वन डे विश्वचषकांबद्दलदेखील या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.

 

2021 चा महिला वन डे विश्वचषक आता 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022 मध्ये न्यूझीलंडला आयोजित केला जाणार आहे. तर 2023 मध्ये होणारा पुरूषांचा एकदिवसीय विश्वचषक पूर्वनियोजित योजनेनुसार भारतात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.