T20 World Cup : T20 विश्वचषकाबाबत आयसीसीच्या पुढील बैठकीत निर्णयाची शक्यता 

Possibility of decision at next ICC meeting on T20 World Cup यंदाच्या T20 विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलीयात करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज –  ऑस्ट्रेलीया मध्ये आयोजित केलेल्या यंदाच्या T20 विश्वचषकाबाबत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या आगामी बैठकीत बहू प्रतिक्षीत T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या बैठकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी येत्या एक ते दोन आठवड्यात ही बैठक घेतली जाऊ शकते. मात्र, त्याची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

एएनआय’ला आयसीसी सूत्रांनी T20 विश्वचषक आणि आयसीसीच्या अध्यक्ष निवडीबाबत माहिती देताना असे सांगितले की, अध्यक्ष निवडीबाबत काही सांगता येणार नाही पण येत्या बैठकीत T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या T20 विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलीयात करण्यात आले आहे. ओक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 दरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या बाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.