Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेनिमित्त टाळ, मृदुंगाची दुकाने सजली; सर्वत्र हरिनामाचा गजर

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (Kartiki Yatra) सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक वारकरी आळंदीतमध्ये दाखल होत आहेत. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत टाळ, मृदुंगाची, हार, प्रसादांची, तुळशीमाळांची ,धार्मिक ग्रंथ साहित्याची इ. अशा विविध प्रकारच्या साहित्य वस्तूंची दुकाने येथे सजली आहेत. अखंड हरिनाम सप्ताहाने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने व हरिभजनाने येथील वातावरण अगदी भक्तिमय झाले आहे. माऊली मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Pune news : फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून 24 कोटी सात लाख मंजूर

इंद्रायणी घाट वारकरी भाविकांमुळे हळूहळू गजबजू लागला आहे. माऊलींची भिंत, विश्रांतवड (Kartiki Yatra) व सिद्धबेट या ठिकाणी भाविक दर्शनास जात आहेत. सिद्धबेटामध्ये माऊली पर्णकुटीसमोर तसेच तेथील वृक्षांच्या छायेत ग्रंथाचे पारायण भाविक करत आहेत.

दुपारी रस्त्याच्या कडेने व इतर ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या छायेखाली, राहुट्यांमध्ये वारकरी भाविक विश्रांती घेताना दिसत होते. तर, काही दुपारी दिंड्याच्या पंगतीमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना वारकरी भाविक दिसत होते. पहाटे ते संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी वासुदेव अभंग हरिनाम गात फिरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.