Taapasee twits on trials: न्यायालयाच्या आधीच एखाद्याला दोषी समजणे चुकीचे – तापसी

सुशांतप्रकरणी आज सीबीआय सुशांतची बहीण मीतूची चौकशी करण्याची शक्यता आहे. सध्या मीतूला फक्त बोलावण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणीचे गूढ उकलण्यासाठी सीबीआय कसून चौकशी करत आहे. मागील तीन दिवसांपासून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची उलटसुलट चौकशी करण्यात येत आहे. पण तिच्यावरील आरोप सिद्ध होण्यापूर्वीच तिला माध्यमांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. अनेकविध न्यूज चॅनेल रियाच कशी दोषी आहे हे रंगवून रंगवून सांगत आहेत. पण तिच्यावरील आरोप सिद्ध व्हायच्या आधीच तिला दोषी ठरवणे काही जणांना पटत नाही.

अभिनेत्री तापसी पन्नूने या प्रकरणात पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तापसीने म्हटले आहे, ‘मी सुशांतला वैयक्तिकरित्या फारशी ओळखत नव्हते. तसेच मी रियाला देखील ओळखत नाही. पण एवढे मात्र नक्की जाणते की, न्यायालयाच्या आधीच दुस-या कोणीतरी एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करणे चुकीचे आहे. न्यायालयावर विश्वास ठेवा’.

सुशांतप्रकरणी आज सीबीआय सुशांतची बहीण मीतूची चौकशी करण्याची शक्यता आहे. सध्या मीतूला फक्त बोलावण्यात आले आहे. कदाचित त्यानंतर सुशांतची दुसरी बहीण प्रियांका आणि तिचे पती सिद्धार्थ यांची देखील चौकशी होऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.