Nigdi : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात तबला रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि ओम तबला वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना या तबला वादनाच्या कार्यक्रमास सर्व स्तरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ओम तबला वर्गच्या विद्यार्थ्यांनी उत्तम तबला वादन केले. यामध्ये उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

गुरुवंदना तबला वादन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हभप किसन महाराज चौधरी, बाळासाहेब काशिद, मुकुंद इनामदार, डॉ. विश्वास मोरे, राहुल कलाटे, रेखा मित्रगोत्री आदी उपस्थित होते. आर्या घुघरी, राज माने, रुद्रप्रताप शिंदे, वेदांत गुळवणी, अद्वैत दलाल, आदित्य कोठडिया, क्षितिज परमेश्वर, सुमित उम्बरे, अमित शिंदे, अर्णव कोठावदे, पार्थ शेंगुले, विराज काकडे, वेद थिटे, वरद देवहारे, अथर्व जोशी, अभंग काशिद, चिराग रासने, शौनक पाटील, अर्णव कारके, सार्थक बाबर, अश्विक रत्नाकर, प्रणव अमराले, ऋषिकेश स्वामी, चिन्मय कुलकर्णी, हार्दिक सोनवणे, निर्भय पवार, तनिष खराडे या विद्यार्थ्यांनी तबला वादन सादर केले.

कार्यक्रमाची सुरवात गणेश स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर ओम तबला वर्गाच्या विद्यार्थ्यांचे तबला सहवादन झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचे सोलो वादन झाले. त्यांनी राग वाचस्पतिच्या माध्यमातून रासिकांची मने जिंकून घेतली. त्यांना तबल्यावर अमोल राऊत यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा दलाल यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन विनय गुळवणी यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थी ज्यांना तबला वादनाची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यामुळे तबला वादनात आवड असणा-या विद्यार्थ्यांना त्यांची आवड जपता येणार आहे. यातून भविष्यातील उत्तम कलाकार तयार होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.