Dehuroad Crime News : तडीपार आरोपीला देहूरोड येथून केली अटक 

एमपीसी न्यूज – तडीपार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तरीही बाहेर वावरतांना आढल्याने शुक्रवारी (दि.08) पोलिसांनी त्याला देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. 

विजय उर्फ भज्जी नागेश तेलगु (वय 27, रा. आंबेडकर नगर रोड, देहूरोड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीला भज्जी तेलगु हा पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. आरोपी आदेशाचा भंग करुन बाहेर वावरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.