Dehuroad Crime News : तडीपार आरोपीला कोयत्यासह पकडले

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी जिल्ह्याच्या हद्दीत आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक कोयता मिळाला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 27) रात्री आंबेडकर नगर, देहूरोड येथे करण्यात आली.

विजय उर्फ भज्जी नागेश तेलगू (वय 24, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय तेलगू याला पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याच्या घरी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. विजय याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.