Nigdi Crime News : तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी शासनाची परवानगी न घेता शहरात आला तसेच त्याने बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले, याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) ओटास्कीम, निगडी येथील स्मशानभूमी जवळ करण्यात आली.

गौरव अनिल सरोदे (वय 24, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल साळुंखे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव सरोदे हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शासनाची कोणतीही परवानगी न घेता पिंपरी चिंचवड शहर परिसरात आला.

याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला. याबाबत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.