Pimpri Crime News : तडीपार आरोपी अतुल पवार याला अटक  

एमपीसी न्यूज – दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या आरोपीला आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. 12) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथील पवनेश्वर मंदिराजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 27, रा. मिलिंदनगर, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल पवार याला पोलीस आयुक्त परिमंडळ एकच्या आदेशानुसार 19 जानेवारी 2021 पासून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. आरोपीने आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.