Bhosari News : तडीपार आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी साडेचार वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली.

पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय 30, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई शशिकांत नांगरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवित्रसिंग याला 31 डिसेंबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो पोलिसांची परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात आला. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले.

पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये यासाठी आरोपी पवित्रसिंग याने पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पवित्रसिंग याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.