Pune News : समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार सराईत गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज : तडीपार असतानाही पुणे शहरात खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. सागर भुजंग नायडू (वय 25, रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ पुणे) असे या गुंडाचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना तडीपार गुंड सागर नायडू हा सोमवार पेठेतील शाहू उद्यान भाजी मंडई समोर उभा असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचला.

पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सात गुन्हे दाखल आहेत. 26 मार्च 2019 पासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक विलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते सुरेश चौधर यांच्यासह पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, प्रशांत सरक, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी सचिन पवार, नितीन धोत्रे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.