Chinchwad : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून लोखंडी कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे.

मयूर घोलप, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव आणि पोलीस कर्मचारी चिंचवड परिसरातील फूटपाथ, पान टपरी, चायनीज गाड्यांवर दारू पिणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक शेलार यांना माहिती मिळाली की, चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार मयूर घोलप हा गुरुमैया शाळेजवळ गाडीतून फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून स्विफ्ट गाडीतील इसमाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमाबाबत चौकशी केली असता त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती मिळाली. त्याची कार तपासली असता त्यामध्ये एक लोखंडी कोयता मिळून आला. त्यानुसार, लोखंडी कोयत्यासह कार जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दरोडा, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.