Browsing Tag

theives

Kamshet : भरदिवसा घरफोडी करून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 10) दुपारी बारा ते अडीचच्या सुमारास मावळ तालुक्यातील येवलेवाडी येथे घडली.…

Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी…

Hinjawadi : कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड पळविली; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील एका खासगी कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल राजेश उज्जैनकर (वय…

Wakad : चोरटयांनी वाकडमधून दोन लाखांच्या मोटारसायकल पळविल्या

एमपीसी न्यूज - वाकड परिसरातील रहाटणी आणि मंगलनगर खिंवसरा येथून सुमारे दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Chikhali : चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट; शहरातून चार दुचाकींसह टेम्पो पळविला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने चोरली जात आहेत. गुरुवारी (दि. 5) पिंपरी, दिघी, वाकड, देहूरोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तर हिंजवडी पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा…

Chichwad : दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून एक लाख 38 हजार ऐवजाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून तसेच सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. स्वप्निल मनोहर पाटील (वय 42, रा. आहेरनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…

Akurdi : पत्रा उचकटून दुकानात चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 28 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आकुर्डी येथे शनिवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली. जितू दिलीपकुमार गंभाणी (वय 35, रा. वैभवनगर, पिंपरी वाघेरे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…