Browsing Tag

Wife

Bhosari : उंबराचे झाड तोडण्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून पती-पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी फुगेवाडी येथे घडली.लता अनिल कांबळे (वय 33, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी याप्रकरणी…

Wakad : लाईट बंद करण्यावरुन पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण; पत्नीची पोलिसात फिर्याद

एमपीसी न्यूज -  लाईट बंद करण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीला मारहाण केली. हा वाद दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी पतीवर गुन्हा नोंदवला आहे. घटना बुधवारी (दि. 6) रात्री नढेनगर काळेवाडी येथे घडली.…

Chakan : आईचे आधारकार्ड शोधून न दिल्याने पत्नीला लोखंडी बत्त्याने मारहाण

एमपीसी न्यूज - आईचे आधारकार्ड शोधून देण्यासाठी पत्नीला सांगितले. ते पत्नीने शोधून न दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला खोल बत्त्यातील लोखंडी बत्त्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजता मेदनकरवाडी येथे घडली.…

Dighi : लग्नानंतर एकाच महिन्यात पत्नीने मागितला घटस्फोट; पतीचा पत्नीवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वी पतीचे प्रेम प्रकरण असल्याचे पत्नीला माहिती झाले. या कारणावरून लग्नानंतर एकाच महिन्याने नवविवाहितेने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. या कारणावरून चिढलेल्या पतीने पत्नीला एका लॉजवर बोलावून तिच्यावर चाकूने वार करत खुनी…

Sangvi : ‘इंस्टाग्राम’वरून अश्लील मेसेज आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा;…

एमपीसी न्यूज - पती-पत्नीने आपसात संगनमत करून एका तरुणीला इंस्टाग्रामवरून अश्लील मेसेज तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार 29 ते 31 जानेवारी दरम्यान शितोळेनगर जुनी सांगवी येथे घडला. सांगवी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.मोहित जोधपूरकर असे…

Chinchwad : संगणक अभियंता महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून संगणक अभियंता महिलेने राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.संतोष नामदेव पाटील (वय 37, रा. लिंकरोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी…

Chakan : आईच्या अंत्यविधीस न आल्याने पत्नीचे टिकवाने फोडले डोके; पतीला अटक

एमपीसी न्यूज - आईच्या अंत्यविधीस न जाता घराशेजारच्या लोकांशी हसत गप्पा मारत असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचे लोखंडी टिकवाने डोके फोडले. हा प्रकार रविवारी (दि. 9) सकाळी पाचच्या सुमारास भांबरेवस्ती, महाळुंगे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी…

Chinchwad : कामवाली बाई न आल्यावरून पती-पत्नीचे भांडण; पत्नीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज - कामवाली बाई कामासाठी आली नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नीने घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड…

Chikhali : पोहे बनविल्यावरून पत्नी आणि मुलाकडून पतीला मारहाण; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किचनमध्ये पती पोहे बनवत असताना बाहेरून आलेल्या पत्नीने आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडला.जालिंदर लक्ष्मण सरवदे (वय 49, रा.…

Chikhali : गर्भवती महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरातील काम येत नसल्याच्या कारणावरून गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान मोरेवस्ती, चिखली येथे घडला.…