Pune News : प्रवीण तरडे यांच्यावर कारवाई करा ; लोकजनशक्ती पार्टीचे पोलिसांना निवेदन

Take action against Praveen Tarde; Lok Janshakti Party's statement to the police.

एमपीसी न्यूज – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गणपती डेकोरोशन करताना भारतीय संविधान हे गणपती मूर्तीच्या खाली ठेवले होते त्यामुळे तरडे यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले असून विविध संघटना चांगल्याच आक्रामक झाल्या आहेत. लोकजनशक्ती पार्टी यांच्यावतीने प्रवीण तरडे यांच्यावर कारवाई करा असे निवेदन बंद गार्डन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रवीण तरडे यांनी केलेल्या चूकिबद्दल निषेध करण्यात आला.

बैठकीनंतर बंडगार्डन पोलीस चौकीत जाऊन प्रवीण तरडे यांच्यावर ऍट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,वरिष्ठ उपाध्यक्ष माधव यादव,प्रवक्ते के सी पवार यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांसाठी लिहिलेले संविधान हे मनुस्मृतीच्या खाली आहे असे दाखविण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे यांनी केला असला तरी लोकजनशक्ती पार्टी हे मनुवादी प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा ठराव आज पक्षाच्या पुणे कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.