Pimpri News : नागरिकांशी उद्दामपणे वागणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करा

एमपीसी न्यूज –  पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी कारवाईचा बडगा उगारावा पण त्यावेळी नागरिकांशी उद्दामपणे किंवा मुजोरपणे वागू नये. (Pimpri News) वाहतूक पोलीस देखील कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई करतात, त्यांना याबाबत विचारले असता ते थेट आरेरावीची भाषा वापरतात, अशा वाहतूक पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी निवेदनाद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी ना कळतपणे त्याचे वाहन हे नो पार्किंगमध्ये लावले तर कारवाई करण्यापुर्वी संबंधीत नागरिकाला त्याची पूर्वसूचना द्यावी, मात्र शहरातील वाहतूक पोलीस तसे करत नाहीत. पिंपरी येथे 26 जानेवारी रोजी माझी गाडी मी नजर चुकीने नो पार्किंगमध्ये लावली. तेथे वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिपाई एन.एस गांगड आले व त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट माझ्या व तिथे असलेल्या इतर गाड्यांना 500 रुपयांचा दंड आकारला.

Chinchwad Bye-Election :  लाखांपेक्षा अधिक फरकाने पोटनिवडणूक जिंकण्याचा भाजपचा निर्धार

त्यांना अशी कारवाई का करता, येथे नो पार्किंग आहे याची आम्हाला कल्पना नव्हती, तुम्ही किंमान पूर्वसूचना द्या, अशी विचारणा केली असता गांगड यांनी उलट उत्तरे दिली.(Pimpri News) तसेच वरिष्ठांचा क्रमांक मागितला असता तो देण्यासही गांगड यांनी नकार दिला व वरिष्ठांची धमकी देतो का म्हणत हुज्जत घातली. तरी सर्व सामान्यांनी कोणाकडे दाद मागायची, कारवाईपूर्वी त्यांना किमान कल्पना द्यावी अशी विनंती असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

याविषयी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना पिंपरी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार म्हणाले की, नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. वाहन टो करण्यापूर्वी त्या परिसरात वाहतूक पोलीस जाहीर सूचना देतात. त्या नंतर कारवाई केली जाते. पूर्वकल्पना दिल्यानंतरच पोलीस कारवाई करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.