Pimpri : शहरातील पाणी कपात मागे घ्या

मनसेचे गटनेते सचिन चिखले यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात होणारी पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर व मावळमधील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील 100 टक्के भरले आहे. मागील वर्षी आजमितीला धरणात 88 टक्के पाणीसाठी होता. मागील वेळेपेक्षा यावेळी धरणात 11. 50 टक्के पाणीसाठा अधिक आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना अजून देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

शहरातील काही ठिकाणी पाण्याच्या बाबत बोंबाबोंब सुरू आहे. नागरिकांची नैराश्याची भावना आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर अध्याप देखील सुरू आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्वरित शहरावरील पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना सुरळीत नियोजित व मुबलक पाणीपुरवठा करावा ही विनंती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'877449739ef1616c',t:'MTcxMzYwNzIyNC41MzMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();