Pune : महाराष्ट्र बंद दरम्यान आंबेडकरी कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या -श्याम गायकवाड 

एमपीसी न्यूज – भीमा कोरेगाव दंगलीनंतर झालेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान दलित आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी भीम छावा या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्त्व भीम छावा संघटनेचे प्रदेशध्यक्ष श्याम गायकवाड ,रिपब्लिकन पक्षाचे शैलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाले यावेळी संजय भिमाले,धनंजय सोनवणे ,प्रशांत मस्के ,रफिक शेख ,मंगेश कांबळे ,विशाल कांबळे ,विजय बोकेफोडे ,मारुती बनसोडे ,अनिकेत पालखे ,यल्लपा गायकवाड ,नरेश माडनूर ,अजय वाल्हेकर यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.