Pimpri: स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करा; आरोग्य मंत्र्यांच्या पालिकेला सूचना

आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांची 'वायसीएमएच्‌'ला भेट

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्ल्यू, डेंग्यूसह साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे दक्षाता घेण्यात यावी. औषधांचा मूबलक प्रमाणात साठा ठेवावा. साथीच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू रोगासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी पिंपरी महापालिकेला दिले आहेत. 

पिंपरी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूगाणालयाला आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज (मंगळवारी) भेट दिली. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली. अधिका-यांची बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, वायसीएमचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज देशमुख, डॉ.प्रदिप औटी, डॉ.संजय देशमुख उपस्थित होते.

बैठकीची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. शहरामध्ये स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आल्याने रूग्णालयाकडून घेण्यात येणा-या स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाय योजना, पदव्यूत्तर संस्था स्थापन करण्याच्या कामाचा आढावा मंत्री डॉ. सावंत यांनी घेतला. डेंग्यू सदृश आणि डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करा. नागरिक भयभीत होऊ देऊ नका. त्याची व्यापक जनजागृती करा, अशा सूचना मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या असल्याचे, हर्डीकर यांनी सांगितले.

स्वाईन फ्ल्यूने सहा जणांचा मृत्यू झाला असून आजमितीला तिघे जण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर, दोघांची प्रकृती स्थिर आहे. पालिकेतर्फे शहरात औषध फवारणी केली जात आहे. पावसामुळे डबक्यात पाणी साचून राहत असून डेंग्यूची उत्पती वाढत आहे. त्यासाठी वारंवार औषध फवारणी केली जात आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.