-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali News : ‘इंद्रायणी’ पात्रालगत कचरा जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा : दिनेश यादव

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : इंद्रायणी नदी पात्राच्या परिसरात तळवडे व चिखलीच्या शिवेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. तसेच जास्त कचरा झाल्यावर कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. त्याचा आजुबाजुला राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लगत असून अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कचरा टाकणारे आणि कचरा जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

या संदर्भात दिनेश यादव म्हणाले, इंद्रायणी नदीच्या पात्राच्या परिसरात तळवडे व चिखलीच्या शिवेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. शिवाय तिथे प्लास्टिक, रबर, आँईलने मळलेले कपडे जाळले जातात. रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टरमधून कचऱ्याची वाहतूक करून तो तळवडे मार्ग शेलारवस्ती जवळच्या खाणीच्या रोडने नदीपात्रात टाकला जातो. तसेच या ठिकाणी लाकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे.

लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे जळालेला कचरा पावसाच्या पाण्यातून नदीपात्रात मिसळून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होणार आहे. त्यातून पुढे जलपर्णीची वाढ होण्यास मदत होणार आहे. शिवाय या दूषित पाण्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांचे अस्तित्व संपुष्ट येणाची शक्यता आहे.

या गोष्टी टाळण्यासाठी कचरा टाकणाऱ्या टोळीवर महापालिका  पर्यावरण विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी दिनेश यादव यांच्यासह स्थानिक नागरिक भाऊसाहेब रोकडे, विजय तापकीर, अमर लोंढे आदींनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.