Talegoan : ब्रिजवासी स्वीट होम खाद्यविक्रेत्यावर कडक कारवाई करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ब्रिजवासी स्वीट होम येथे मिळणाऱ्या अन्नपदार्थाबाबत खाद्यविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच तळेगाव दाभाडे येथील नव्याने येऊ घातलेल्या बेकरी व स्वीटहोम यांच्याकडे मिळणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी करण्यात यावी, असे  निवेदन प्रदीप नाईक यांनी अन्न औषध प्रशासन विभागाला दिले.

मागील आठवड्यामध्ये ब्रिजवासी स्वीट होम मध्ये एका ग्राहकाच्या ढोकळ्यामधे झुरळ आढळले. तसेच काही अन्नपदार्थ हे खाण्यायोग्य नसतात, शिळे असतात, आंबट वास येतो अशाही तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. यामुळे ग्राहकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच इतर बेकऱ्या, स्वीट होममधील अन्नपदार्थाची देखील सखोल तपासणी करावी. आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.