BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शिवतारे म्हणतात पुणेकरांनी नियमानुसारच पाणी घ्या ! 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पाटबंधारे विभागातर्फे पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्यावर बुधवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे गुरुवारी (11 ऑक्टोबर) शहरातील पूर्व भागाला कोणतीही कल्पना न देता पाणी मिळालेले नाही. यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हे पाणी बंद केलं की नाही याबाबत माहिती घेतो मात्र पुणेकरांनी नियमानुसारच पाणी घ्यायला हवं.

40 लाख लोकसंख्यानुसार आणि नियमानुसार 8.25 टीएमसी पेक्षा जास्त पाणी लागलं नाही पाहिजे हा नियम आहे. पाणी कमी वापरा जपून वापरा अशा सूचना कालवा समितीती केल्या होत्या अस देखील विजय शिवतारे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात मुंबई येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला दररोज 1150 एमएलडी पाणी उचलण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार आजपासून शहरात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.