Anti Covid Shop : Covid-19 च्या परिस्थितीचा फायदा उठवत पुण्यातील तरुणाने सुरु केलं ‘अँटी कोविड शॉप’

Taking advantage of Covid-19 situation, Pune youth started 'Anti Covid Shop' पुण्यातील हितेश वाधवाणी ​​नावाच्या तरुणाने​ देखील या संधीचा फायदा घेत 'अँटी कोविड शॉप' सुरु ​केले​ .

एमपीसी न्यूज – लॉकडॉऊनमुळे आमच्या नोकर्‍या गेल्या,  लॉकडाऊन मुळे आमचा उद्योग बुडाला, लॉकडाऊनमुळे आमचं नुकसान झालं अशा अनेकांच्या तक्रारी आहे. परंतु काही लोकं अशी आहे की ज्यांनी या लॉकडाऊनचा फायदा उचलला. पुण्यातील हितेश वाधवाणी ​नावाच्या तरुणाने​ देखील या संधीचा फायदा घेत ‘अँटी कोविड शॉप’ सुरु ​केले​ .

हितेशने पुण्यातील कॅम्प परिसरात अँटी कोविड शॉप सुरु केले. त्याच्या शॉप मध्ये covid-19 विरोधात लढा देणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. जसे की मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, सॅनिटाझर ठेवण्यासाठी लागणारे स्टँड या सर्व वस्तू त्याने एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. अशा प्रकारच्या या वस्तू एकाच छताखाली मिळणार पुण्यातील हे पहिलं दुकान असावे.

आपल्या या अँटी कोविड शॉप विषयी सांगताना रितेश म्हणतो आमच्या सोसायटीसाठी आम्हाला covid-19 च्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षिततेच्या वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा या सर्व वस्तूंसाठी आम्हाला वेगवेगळी दुकान शोधावी लागली. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली या सर्व वस्तू आपण एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या तर आणि मग तिथून पुढे आम्ही हे दुकान टाकले. सध्या आम्हाला रिस्पॉन्स ही चांगला मिळतो.

लोकांना लागणाऱ्या वस्तू आम्ही गरजेनुसार तयार करून देऊ शकतो. समजा एखाद्या कंपनीला सॅनिटायजर, मास्क किंवा सॅनिटायझर स्टँडवर स्वतःच्या कंपनीचं नाव अथवा लोगो टाकून पाहिजे असेल तर आम्ही तेही करून देऊ शकतो. यानुषंगाने आम्हाला ऑर्डर येण्याची सुरुवात झाली.

पुण्याचा कॅम्प मधील महात्मा गांधी रस्त्यावर असणारं हितेशचे हे ‘अँटी कोविड शॉप’ सध्या चर्चेत आहे. कारण लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्याने संधी म्हणून वापर केला आणि त्या संधीचं सोनं करत हे दुकान सुरू केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.