Maval News : टाकवेतील महिंद्रा कंपनीच्या कामगारांनी जपले सामाजिक भान

एमपीसी न्यूज – महिंद्रा कंपनीतील एस.के. असोसिएटस या ठेकेदारांच्या कामगारांनी सामाजिक भान जपत सहारा वृध्दाश्रमात फळेवाटप कार्यक्रम घेतला. आंदर मावळातील कुसवली या गावात अनाथ-निराधार आजी आजोबांसाठी सहारा वृध्दाश्रम आहे. एस. के. असोसिएटसचे मालक संतोष सातकर, विकास सातकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी नुकतीच या आश्रमास भेट दिली.

केळी, सफरचंद, डाळिंब आदी फळांचे त्यांनी वाटप करून आजी आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांना मायेचा आधार दिला. कुसवलीतील विजय भालेराव व ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ भालेराव यांचा मुलगा साहिल याचा वाढदिवसही यावेळी केक कापून व आजी आजोबांना फळे देऊन साजरा करण्यात आला.

यावेळी सुरेश भालेराव, मयुर मेंगडे, पांडुरंग कुटे, शंकर शिंदे, सखाराम भालेराव, विकास मालपोटे, सचिन गायकवाड, रमेश कशाळे, सिद्धार्थ भालेराव, विजय भालेराव,संदीप मोहन, किरण शिंदे, शिवाजी कशाळे, उल्हास चिमटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत करत “ आम्ही घडलो वाचनाने” हे स्वत: लिहिलेले पुस्तक यानिमित्ताने सर्वांना भेट म्हणून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.