Lonavala : सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाखांची लाच घेताना तलाठ्यासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना तलाठी आणि दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, गुरुवारी (दि. 12) कार्ला येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II
घनश्याम शंकर सोमवंशी (वय 43) असे अटक केलेल्या लाचखोर तलाठ्याने नाव आहे. त्याच्यासह गणेश गोपीनाथ वायकर, अविनाश सुनील देवकर यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे दोन लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मागितलेल्या रकमेतील एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना अटक केली. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.