Charholi Crime News : मृत्यूपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबा-यावर घेण्यासाठी तलाठ्याने घेतली 30 हजारांची लाच

एमपीसी न्यूज – मृत्यूपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबा-यावर घेण्यासाठी च-होलीच्या तलाठ्याने 30 हजारांची लाच घेतली. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 27) दुपारी च-होली येथे करण्यात आली.

मारूती अंकुश पवार (वय 41) असे रंगेहाथ पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याजवळील मृत्युपत्राची व हक्कसोडपत्राची नोंद सातबारा सदरी घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी मारूती पवार याने मृत्यूपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबा-यावर घेण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली, त्यानंतर तडजोड करून 30 हजार रुपये देण्याचे ठरले.

याप्रकरणी तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली असून एसीबीने सापळा लावून सोमवारी दुपारी 30 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.