Manchar Crime News : जमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठ्याने ठेतली चार हजारांची लाच

एमपीसी न्यूज – जमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठ्याने चार हजारांची लाच घेतली. याप्रकरणी आंबेगाव तालुक्यातील सजा पेठच्या तलाठ्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत दिलीप भागवत (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याने नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने पेठ येथे जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी हेमंत भागवत याने सहा हजारांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून चार हजार रुपये तक्रारदाराकडून लाच घेतली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी भागवत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.