BNR-HDR-TOP-Mobile

Pune : 9 हजारांची लाच स्विकारताना तलाठी रंगेहाथ

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – सात-बारा उता-यावर नोंद करण्यासाठी 9 हजारांची लाच  स्विकारणा-या तलाठ्याला  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज  गुरूवारी
(दि.11) सासवड येथील तलाठी कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.

देवानंद उखा लोहार (वय 49) असे लाच स्विकारणा-या तलाठ्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका इसमाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांच्या आईच्या नावावर
सोनेरी या गावात असलेल्या जमिनीची फिर्यादी व त्यांच्या भावांमध्ये
केलेल्या जमिनीच्या वाटपपत्राची सात-बारा उता-यावर नोंद करण्यासाठी तलाठी
देवानंद यांनी 10 हजारांची लाच मागितली होती  व तडजोडीअंती त्यांनी
फिर्यादीकडे 9 हजारांची मागणी केली होती.

तक्रारीची दखल घेऊन तातडीने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी
कारवाई करत तलाठी कार्यालयात सापळा रचून तलाठी देवानंद यांना 9 हजारांची
लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.