Pune News : वेल्ह्यातील तलाठी 8 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसी न्यूज : सातबारा उताऱ्यावर  नोंद करण्यासाठी आणि जागेचा उतारा देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना वेल्ह्यातील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या संस्थेने वेल्हा येथे 20 गुंठे जागा विकत घेतली आहे. त्यांनी जागा खरेदी करण्यापूर्वी सदर जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात संपर्क केला होता. यावेळी तलाठी मुकुंद चिरटे यांनी या कामासाठी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा कारवाईत लोकसेवक मुकुंद यांना तडजोडीअंती 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.