Talavade : पीएमपीएमएल बस प्रवासात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना प्रवाशाचा अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप चोरला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळवडे बसस्टॉप येथे घडली.

मी प्रतिक प्रेमचंद कदम (वय 33, रा. बालेवाडी, बाणेर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम तळवडे येथील एका खासगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहा वाजता ते काम संपवून पीएमपी बसने घरी जाण्यासाठी निघाले.

तळवडे बसस्टॉपवर बस आल्यानंतर कदम यांनी त्यांची बॅग बघितली असता त्यामध्ये त्यांचा लॅपटॉप दिसला नाही. त्यांनी सर्वत्र चौकशी केली मात्र, त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप मिळून आला नाही. याबाबत त्यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.