Talavade Crime News : कंपनीच्या गोडाऊन मधून 24 लाख 50 हजारांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी 2.5 टन वजनाचा हॅमर मशीनचा बेस आणि लोखंडी ऑइल टॅंक असा एकूण 24 लाख 50 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. ही घटना ज्योतिबानगर, तळवडे येथील कोहिनूर इंडस्ट्रीज कंपनीत 12 मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली.

शंकर नामदेव काळभोर (वय 61, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांची ज्योतिबानगर तळवडे येथे कोहिनूर इंडस्ट्रीज कंपनी आहे. 9 मार्च दुपारी तीन ते 12 मार्च सायंकाळी पाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपनीत चोरी केली. 15 लाख रुपये किमतीचा हॅमर मशीनचा बेस आणि साडेसात लाख रुपये किमतीचा हॅमर मशीनचा बेस तसेच दोन लाख रुपयांचे सहा लोखंडी ऑइल टॅंक असा एकूण 24 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.