Talavade Crime News : दारूविक्री आणि जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभागाने तळवडे येथे एका जुगार अड्डयावर कारवाई केली. तसेच सोमाटणे फाटा येथे बेकायदेशीरपणे दारुविक्री करणाऱ्या एका हॉटेलवर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तळवडे येथे मोकळ्या जागेत काही लोक कल्याण मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. त्यात 57 हजार 400 रुपयांची रोख रक्कम, 105 रुपयांचे मटका साहित्य आणि 87 हजारांचे 12 मोबाईल फोन असा एक लाख 44 हजार 505 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नवनाथ लक्ष्मण मगर (वय 33, रा. वेताळ नगर, चिंचवड) आणि अन्य दहा जणांच्या विरोधात याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई सोमाटणे फाटा येथे हॉटेल शांताई व्हेज नॉनव्हेज ढाबा येथे केली. हॉटेलमध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईमध्ये 13 हजार 944 रुपयांची देशी विदेशी दारू, बिअर बॉटल, 7 हजार 480 रुपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन असा एकूण 31 हजार 424 रुपयांचा ऐवज जप्त केला.

यात मंगेश सखाराम दाभाडे (वय 38, रा. शनिवार पेठ, तळेगाव) याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण एक लाख 75 हजार 929 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879fb0339f4705ee',t:'MTcxNDA2MjMyMi4wMjAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();