Talavade News : तळवडे येथे महिला सफाई कामगारांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

एमपीसीन्यूज : महात्मा गांधी जयंती निमित्त तळवडे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्राची किरण नखाते यांच्या पुढाकारातून परिसरात सफाई काम करणाऱ्या महिलांचा सनकोट, सॅनिटायझर आणि मास्क वाटप करुन सन्मान करण्यात आला.

तळवडे येथे देहू-आळंदी रस्त्यावरील स्वर्गीय मुकुंद बाळा नखाते चौक येथे शहर भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संकल्पनेतून आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका प्राची नखाते यांच्यासह नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर चिटणीस किरण नखाते, रमेश भालेकर, रामदास कुटे, अस्मिता भालेकर, वनदेव खामकर, संतोष नखाते, प्रसाद नखाते, प्रदीप नखाते, युवा नेते निलेश भालेकर, नामदेव पिंजण आदी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळातही सफाईचे काम करावे लागत आहे. अशावेळी सनकोट, सॅनिटायझर आणि मास्क मिळाल्याने सफाई महिला कामगारांनी प्राची नखाते यांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.